Rinku Rajguru: मी नको म्हणत होते पण त्यांनी.. ‘सैराट’बाबत रिंकूचा मोठा खुलासा
सिनेमा

Rinku Rajguru: मी नको म्हणत होते पण त्यांनी.. ‘सैराट’बाबत रिंकूचा मोठा खुलासा

Rinku Rajguru : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून रिंकु राजगुरुचं (rinku rajguru) नाव घेता येईल. प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ (sairat) या चित्रपटामध्ये रिंकुनं भूमिका केली होती. तिचा तो पहिला चित्रपट. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. सध्याच्या घडीला मराठी अभिनेत्रींमध्ये ती आघाडीची अभिनेत्री आहे. वेबसीरिज असो वा चित्रपट रिंकुनं दमदारपणे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या झुंड (jhund) आणि ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटांतून रिंकूने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. रिंकु नुकतीच झी मराठी वरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिनं सैराट चित्रपटातील एक भन्नाट किस्सा सांगितला. (actress rinku rajguru participate in bus bai bus show on zee marathi host by subodh bhave) गेली काही दिवस सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होतात यावेळी त्यांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे (subodh bhave) करत आहे. या कार्यक्रमात आजवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकतीच या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने सैराट चित्रपटात तिला विहिरीत कशा पद्धतीने ढकलण्यात आले हा किस्सा सांगितला.Recommended Articlesडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अखेर भुवनेश्वरने दिला ग्रीनच्या तुफानी खेळीला रेड सिग्नलIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 2 hours agoPune Crime: मैत्रीणीसोबत गप्पा मारत बसलेल्या युवकांची निर्घृण हत्यापुणे – पुण्यातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात दारूची बॉटल आणि झाडाची कुंडी घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. Pu2 hours agoNashik : लहान मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा ; पोलिसांचे आवाहनमालेगाव: राज्यात लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु आहेत. लहान मुले चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडीयावर झळकत आहेत. या अफवांमुळे शहरासह परिसरात भितीचे वातावरण आहे. पालक यामुळे चिंतेत असून, काही पालक मुलांना शाळेत पाठविण्यास2 hours agoसैराट चित्रपटात आर्ची म्हणजेच रिंकू विहिरीत उडी मारतानाचा सीन आहे. हा सीन प्रचंड गाजला. म्हणून ‘तुम्ही अशी विहिरीत उडी मारली की सगळ्या पोरींना तुमचं कौतुक वाटलं. तुम्हाला आधीच पोहता येत होत की तुम्ही तेव्हा शिकलात?’ असा पप्रश्न रिंकूला या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर रिंकू म्हणाली, ‘मला आधीपासूनच पोहायला येत होतं. मला माझ्या बाबांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये पोहायला शिकवलं होतं. त्याचा उपयोग मला सैराटसाठी झाली. पण उडी मी पहिल्यांदाच मारली होती. तेव्हा मला फार भिती वाटली होती’. View this post on Instagram A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) रिंकू पुढे म्हणाली, ‘शुटच्या वेळी मी खूप घाबरलेली होते. मला उंचावरून उडी मारायला खूप भिती वाटत होती. मी त्यांना शुटींगच्या वेळी म्हणत होते की, मी नाही करत हा शॉर्ट, आपण काहीतरी पर्याय शोधू, पण त्यांनी मला म्हणाले, ‘मारते की देऊ ढलकलून’.. मग मी थोडा वेळा घेऊन तो सीन केला.  आधी कधीच मी विहीरीत उडी मारलेली नव्हती.  पण पहिल्या 2 टेकमध्ये मी सीन कम्प्लिट केला होता.  पहिल्या वेळी चेहऱ्यावर खूप टेन्शन होतं दुसऱ्या वेळी सीन पूर्ण केला’. असा अनुभव तिने सांगितला.