SCO Summit 2022 : अन्न संकट, युक्रेन युद्ध अन्…; SCO समिटमधील मोदींचे मुद्दे
ताज्या बातम्या

SCO Summit 2022 : अन्न संकट, युक्रेन युद्ध अन्…; SCO समिटमधील मोदींचे मुद्दे

PM Modi In SCO Summit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओ समिटमध्ये सहभागी होण्यासाठी उझबेकिस्तान येथे गेले आहेत. येथे त्यांनी सहभागी विविध देशातील प्रमुख नेत्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी जागतिक अन्न संकट, युक्रेन युद्ध अशा अनेक मुद्द्यांवर भारताची भूमिका स्पष्ट केली. मोदींनी या परषेदेत नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवरभाष्य केले ते थोडक्यात जाणून घेऊया. परिषदेला संबोधित करताना मोदींनी हिंदीमध्ये भाषण केले. यावेळी त्यांनी भारताची अर्थव्यवस्था यावर्षी ७.५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असल्याचे सांगितले. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले. भारत प्रत्येक क्षेत्रात नाविन्यपूर्णतेला पाठिंबा देत असून, आज भारतात 70 हजारांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. ज्यामध्ये 100 हून अधिक युनिकॉर्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या क्षेत्रातील भारताचा अनुभव SCO देशांसाठी उपयुक्त ठरू शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. Recommended Articlesरात्रीच्या शिळ्या डाळीपासून हे पदार्थ करारात्रीची शिळी डाळ फेकण्यापेक्षा त्यापासून इतर पदार्थ तयार करता येतील. 3 hours agoरश्मिका मंदानाने वाढवले पुन्हा फॅन्सच्या हृदयाचे ठोके…दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाची फॅन फॉलोइंग खूपच मोठी आहे.3 hours agoKuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तरKuldeep Yadav Hat-Trick : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कधी भारतीय संघात दिसतो तर कधी नाही. जरी संघात असला तरी त्याला मालिकेतील सर्व सामन्यात खेळण्याची संधी मिळले याची शाश्वती नसते. मात्र भारतीय ‘अ’ संघाकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवने निवडसमिती आणि संघ व्यवस्थापनाला आपल्याबाबत नव्याने व3 hours agoत्या वक्तव्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाणांनी गमावले ?डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरुन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. मंत्री चव्हाण यांच्या डोंबिवलीतील त्या वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज झाला आहे. डोंबिवलीतील शिंदे गटासह ठाकरे गटाने देखील चव्हाण यांच्यावर रस्ते कामावरुन टिकेची 3 hours agoहेही वाचा: देवरूख ः जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी उद्योगमंत्र्यांचे प्रयत्नपीएम मोदी म्हणाले, जग कोरोना विषाणूच्या साथीवर मात करत आहे. कोविड आणि युक्रेनच्या संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीत अनेक व्यत्यय आले. मात्र, आम्हाला भारताला उत्पादन केंद्र बनवायचे आहे. आम्ही स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनवर विशेष कार्यगट स्थापन करून SCO सदस्य देशांसोबत आमचा अनुभव शेअर करण्यास तयार आहोत. हेही वाचा: Video : भाजपनं केजरीवालांसमोर टेकले हात; थेट घरच्यांनाच केली विनंती एप्रिल 2022 मध्ये WHO ने गुजरातमध्ये पारंपारिक औषधांच्या जागतिक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हे WHO द्वारे पारंपारिक औषधांसाठीचे पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र असून, पारंपारिक औषधांवरील नवीन SCO वर्किंग ग्रुपसाठी भारत काम करण्यास तयार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.