Shah Rukh Khan : किंग खानची झाली चांदी! सिनेमाच्या रिलीजपूर्वीच कोट्यवधींची कमाई
सिनेमा

Shah Rukh Khan : किंग खानची झाली चांदी! सिनेमाच्या रिलीजपूर्वीच कोट्यवधींची कमाई

Shah Rukh Khan News बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) चाहते चार वर्षांपासून त्याच्या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. जवळपास चार वर्षांनंतर शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळाली ती म्हणजे ब्रह्मास्त्र सिनेमामधून. ब्रह्मास्त्र सिनेमांमध्ये शाहरुख खानने एका संशोधकाची भूमिका साकारली होती. मात्र, असं असले तरी शाहरुख खानचा सिनेमा कधी येणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.सध्या शाहरुख (Shah Rukh Khan) अनेक मोठ्या प्रोजेक्टवर काम करीत आहे. त्यापैकीच एक एटली यांचा जवान सिनेमा. हा सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित होईल. जवान सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी बराच वेळ असला तरी या सिनेमाने प्रदर्शित होण्यापूर्वीच कोट्यवधींची कमाई केली आहे. होय जवान सिनेमाने प्रदर्शनाच्या आधीच तब्बल अडीचशे कोटी कमावल्याच्या चर्चा आहेत.Recommended Articlesसचिन पायलट यांच्याऐवजी निकटवर्तीयाला CM बनवण्याचा गेहलोत यांचा आग्रह? ठरावही केला
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी अशोक गेहलोत गटाचे सुमारे 56 आमदार काँग्रेसनेते शांती धारीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. धारीवाल हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. (sachin pilot news in Marathi)55 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पुन्हा स्लॉग ओव्हरचं दुखणं; टीम डेव्हिडकडून धुलाईIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.1 hours agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.1 hours agoहेही वाचा: Advance Booking : विक्रम वेधाची ७,८४३ तिकिटे विकली गेली; तब्बल इतकी कमाईदोन महिन्यांमध्ये शाहरुख खानच्या जवान या सिनेमाचं शूटिंग पूर्ण होईल. २०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाने प्रदर्शित होण्यापूर्वीच अडीचशे कोटींहून अधिक कमावले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सिनेमाचे सॅटेलाईट आणि स्ट्रीमिंग राईट्स आधीच विकले गेले आहेत. नेटफ्लिक्सने (Netflix) जवान सिनेमाच्या स्ट्रीमिंग राईट्ससाठी अडीचशे कोटी मोजले आहेत. झी टीव्हीने सिनेमाचे सॅटेलाईट राईट्स म्हणजेच प्रसारणाचे हक्क खरेदी केले आहेत. मात्र, यासाठी झी टीव्हीने किती पैसे मोजले हे अद्याप कळू शकलेले नाही.हेही वाचा: Viral Video : प्रियांका चोप्राने पती निक जोनासला स्टेजवर केले KISSजवानमध्ये तगडी स्टारकास्टजवान सिनेमामध्ये थलपती विजय, विजय सेतुपती आणि नयनतारा हे कलाकार झळकणार आहेत. हिंदी सोबतच हा सिनेमा तमिळ, तेलगू आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होईल. २०१८ मध्ये आलेल्या झिरो सिनेमानंतर शाहरुख खान एकाही सिनेमात झळकलेला नाही. मात्र, लवकरच तो तीन धमाकेदार सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार हिरानी यांच्या डंकी आणि सिद्धार्थ आनंद यांच्या पठान या सिनेमातून शाहरुख खान झळकणार आहे. एवढेच नव्हे तर सलमान खानच्या टायगर-३ या सिनेमात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतून झळकणार आहे.