Share Market : ‘या’ सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये 70% प्रॉफीट
अर्थविश्व

Share Market : ‘या’ सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये 70% प्रॉफीट

Share Market : स्वस्त शेअर्समध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवायचा असेल, तर पीएसयू स्टॉक भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये (BHEL) पैसे गुंतवण्याचा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. आम्ही भारतातील इंजिनिअरिंग आणि मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी मालकीची कंपनी, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या शेअर्सबाबत बोलत आहोत. शुक्रवारी सुमारे एक टक्क्याने घसरून 58.80 रुपयांवर ट्रेड करत होते. त्यामुळे या शेअर्समध्ये खरेदी करण्याची चांगली संधी आता असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. हेही वाचा: Share Market : या दोन स्टॉकमध्ये मिळेल बंपर रिटर्न, तुमच्याकडे आहेत का ?सध्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे शेअर्स खूप स्वस्त मिळत असल्याचे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले आहे. जर तुम्ही त्याचे शेअर्स सध्याच्या किंमतीनुसार खरेदी केले तर तुम्हाला 70 टक्के नफा मिळू शकतो. यात गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी 100 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. वस्तूंच्या किमती नरमल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ होईल आणि विजेची मागणी वाढल्यामुळे कंपनीचा व्यवसायही मजबूत होईल असे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : ग्रीनची तुफान फटकेबाजी; कांगरूंची आक्रमक सुरूवातIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 60 minutes agoNashik : लहान मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा ; पोलिसांचे आवाहनमालेगाव: राज्यात लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु आहेत. लहान मुले चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडीयावर झळकत आहेत. या अफवांमुळे शहरासह परिसरात भितीचे वातावरण आहे. पालक यामुळे चिंतेत असून, काही पालक मुलांना शाळेत पाठविण्यास1 hours agoAmey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली Amey Wagh Vs Sumeet Raghwan: अभिनेता अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय. आज दिवसभर या दोन्ही अभिनेत्यांमधील वादानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु आहे हे मात्र नेटकऱ्यांना समजलेलं नाही. अनेकांना हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटते1 hours agoभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना हे नियम पाळातुम्हाला भरपूर भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवायची सवय असेल तर काही नियम पाळा. 1 hours agoहेही वाचा: Share Market: शेअर बाजारात तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 337 तर निफ्टी 89 अंकांनी घसरला गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीचा व्यवसाय चांगला होता असे तज्ज्ञांनी सांगितले. फिक्स्ड कॉस्टमध्ये कपात आणि तरतुदींमध्ये बदल केल्यामुळे त्याचा EBITDA 740 कोटी रुपयांवर गेला. कच्चा माल स्वस्त होण्याची शक्यता आणि हायर ऑपरेटिंग लीव्हरेजमुळे कंपनीचा नफा वाढेल असा विश्वास ब्रोकरेज फर्मला वाटत आहे. शिवाय येत्या तिमाहीत पॉवर ऑर्डर्स वाढण्याची शक्यता आहे.हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात विक्रीचा जोर कायम, सेन्सेक्स निफ्टी घसरलायेत्या दशकात 43 GW कोळशावर चालणारे संयंत्र जोडले जातील, त्यापैकी 25 GW वर काम सुरू झाले आहे आणि उर्वरित मंजूर होणे बाकी असल्याचे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीने (CEA) अलीकडेच राष्ट्रीय विद्युत योजनेच्या मसुद्यात म्हटले आहे. नवे कोल प्लांट्स ऑर्डर केल्याने BHEL ला येत्या काही वर्षात वीज नसलेल्या विभागांमध्ये प्रवेश करणे सोपे होईल. या सर्व गोष्टींचा विचार करून देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने याला बाय रेटिंग दिले आहे आणि टारगेट 76 रुपयांवरून 100 रुपये केले आहे.हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 262 अंकानी घसरला 70% वाढीची शक्यतागेल्या वर्षी 13 ऑक्टोबरला भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे (BHEL) शेअर्स 78.65 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर होते. त्यानंतर विक्रीचा ट्रेंड होता आणि यावर्षी 20 जून 2022 ला हा शेअर 41.40 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला. हेही वाचा: Share Market : 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तज्ज्ञांचा फेव्हरेटपण, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या (BHEL) शेअर्सनी एका वर्षाच्या नीचांकी पातळीवरून 42 टक्क्यांनी वाढ नोंदवली. येत्या काळातही हा शेअर 70 टक्क्यांनी वाढण्याचा विश्वास तज्ज्ञांना वाटत आहे.हेही वाचा: Share Market : येत्या सहा महिन्यात ‘हे’ शेअर्स देतील दमदार परतावा; तज्ज्ञांचा सल्लानोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.