सिंगापूर ओपन सुपर ५०० बॅडमिंटन: सिंधू फायनलमध्ये पोहोचली,जपानच्या कावाकामीचा केला पराभव
क्रीडा

सिंगापूर ओपन सुपर ५०० बॅडमिंटन: सिंधू फायनलमध्ये पोहोचली,जपानच्या कावाकामीचा केला पराभव

सिंगापूर: भारताच्या पी. व्ही. सिंधू(Pv Sindhu)ने जपानच्या साएना कावाकामीला पराभूत करुन सिंगापूर ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याआधी सिंधूने चीनच्या हान युएचा पराभूत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

त्याआधी महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने हानचे आव्हान १७-२१, २१-११, २१-१९ असे परतवून लावले. ही लढत एक तास आणि दोन मिनिटे चालली. सिंधूने हानविरुद्ध सलग तिसरा विजय मिळवला. या विजयानंतर सिंधूने दोन महिन्यांनंतर उपांत्य फेरीची लढत खेळली. उपांत्य फेरीत तिची लढत आता जपानच्या साएना कावाकामीविरुद्ध झाली. साएनाने सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवांगला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

सिंधूने कावाकामीचा २१-१५, २१-७ असा पराभव केला. सिंधूने जागतिक क्रमवारीत ३८व्या क्रमांकावर असलेल्या कावाकामीवर मिळवलेला हा सलग तिसरा विजय आहे. आता अंतिम फेरीत तिची लढत Aya Ohori आणि Zhi Yi Wang यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
२०२२ मध्ये सिंधू तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. याआधी तिने सुपर ३००च्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. आता तिने प्रथमच सुपर ५००च्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय.
साईना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉयचा पराभव

एच. एस. प्रणॉयला जपानच्या कोदाई नाराओकाविरुद्ध २१-१२, १४-२१, १८-२१ अशा पराभवास सामोरे जावे लागले. पुरुष दुहेरीत दुसऱ्या मानांकित महंमद अहसान-हेंद्रा सेतिवान जोडीने एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला या जोडीवर १०-२१, २१-१८, २१-१७ असा विजय मिळवला.

साईनाचे आव्हान संपुष्टात

लंडन ऑलिम्पिक ब्राँझपदक विजेती साईना नेहवालने या स्पर्धेत सुरुवातीच्या दोन्ही लढतींत सुरेख खेळ केला. दुसऱ्या फेरीत तर तिने चीनच्या दुसऱ्या मानांकित हे बिंग जिआओला नमविले होते. त्यामुळे साईनाला सूर गवसला असे वाटत होते. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अया ओहोरीविरुद्ध तिला २१-१३, १५-२१, २२-२० असा पराभव पत्करावा लागला. ही लढत एक तास आणि तीन मिनिटे चालली. ओहोरीचा हा साईनावरील सलग दुसरा विजय ठरला. साईनाने पहिली गेम गमावल्यानंतर दुसरी गेम जिंकून बरोबरी साधली होती. निर्णायक गेममध्ये साईना २०-१८ अशी आघाडीवर होती. मात्र, हा मॅच पॉइंट काही तिला मिळवता आला नाही. ओहोरीने सलग चार गुण घेऊन गेमसह लढत जिंकली.