घसरणीच्या शेअर बाजारात हे ठरले प्राईस व्हाॅल्युम ब्रेकआउटचे आघाडीचे स्टॉक
अर्थविश्व

घसरणीच्या शेअर बाजारात हे ठरले प्राईस व्हाॅल्युम ब्रेकआउटचे आघाडीचे स्टॉक

मुंबई – नकारात्मक जागतिक संकेतांमुळे निफ्टी५० शुक्रवारी किमान स्तरावर व्यवहार सुरू करता झाला. या विश्लेषणात, अशाही वातावरणात प्राईस व्हॅल्युम ब्रेकआउटचे साक्षीदार ठरलेल्या काही आघाडीच्या स्टॉकवर चर्चा करणार आहोत.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी५० ने सप्ताहअखेरचे सत्र किमान स्तरावर – १७,५९३.८५ वर सुरू केले. अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवरील प्रमुख निर्देशांक सलग तिसऱ्या सत्रात घसरले. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या अपेक्षित व्याजदरात वाढ आणि महागाईला आळा घालण्यासाठी अत्यंत कठोर भूमिकेचा हा परिणाम होता.

जागतिक महासत्तेतील नॅसडॅक कंपोझिट १.३७% ने, डाऊ जोन्स ०.३५% आणि एस अँड पी ५०० निर्देशांक ०.८४% ने घसरले. आशियाई बाजारांनीही नकारात्मक संकेताला पूरक व्यवहार नोंदविले.

सकाळच्या सत्रात निफ्टी५० निर्देशांक १६४.५५ अंकांनी (०.९३%) ने घसरून १७,४६५.२५ वर व्यवहार करत होता. प्रमुख निर्देशांकांच्या अनुषंगाने विस्तृत बाजार निर्देशांक म्हणजेच निफ्टी मिड-कॅप १०० निर्देशांक १.०१% घसरला. तर निफ्टी स्मॉल-कॅप १०० निर्देशांक ०.९३% ने खाली आला.

२२ सप्टेंबरच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदार निव्वळ विक्रेते ठरले. तर स्थानिक गुंतवूकदार हे खरेदीदार होते. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी २,५०९.५५ कोटी रुपयांचे समभाग विकले. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २६३.०७ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

शुक्रवारी सकाळच्या सत्रात प्राईस व्हॅल्युम ब्रेकआउटचे साक्षीदार ठरलेल्या समभागांची यादी पुढीलप्रमाणे आहे. गुंतवणूकदारांनी त्यावर येत्या आठवड्यातील व्यवहारासाठी लक्ष ठेवावे –