Sukesh Chandrashekhar Case: पैशांचा मोह पडला, ईडीचा ससेमिरा मागे लागला!
सिनेमा

Sukesh Chandrashekhar Case: पैशांचा मोह पडला, ईडीचा ससेमिरा मागे लागला!

Sueksh Chandrashekhar: हजारो कोटींचा गैरव्यवहार करुन सध्या तिहार तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरनं बॉलीवूडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. त्यानं आपल्या जाळ्यात काही अभिनेत्रींना अडकवलं. त्यांना महागड्या वस्तू (jacquline Fernandiz news) दिल्या, फ्लॅटची खरेदी करुन दिली. यामुळे त्या अभिनेत्री देखील अगदी सहजपणे त्याच्या जाळ्यात अडकत गेल्याचे दिसून आले. सर्वात प्रथम प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझचे नाव समोर आले. कुणालाही वाटले नव्हते की, जॅकलीन आणि सुकेशची एवढी ओळख असेल…तिच्या घरच्यांना देखील महागड्या वस्तू सुकेशनं दिल्या होत्या.जॅकलीनची ईडीनं चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जॅकलीन तिच्या परिवाराला सुकेशनं मोठी मदत केली होती. श्रीलंकेतील तिच्या कुटूंबियांना पैशांची मदत सुकेशनं केल्याचे ईडीच्या चौकशीतून समोर आले आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध तारकांचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणातून पुढे आले आहेत. त्यात सर्वप्रथम नाव जॅकलीनचे होते. त्यानंतर नोरा फतेहीला देखील ईडीनं चौकशीसाठी बोलावून घेतले होते. आता टीव्ही मनोरंजन विश्वातील आणखी काही अभिनेत्री आणि सुकेश यांचा संबंध असल्याची चर्चा आहे.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अक्षरच्या थेट फेकी मॅक्सवेल बाद; कांगरूंची धावगती मंदावली IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 2 hours agoNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 2 hours agoडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क2 hours agoPune Crime: मैत्रीणीसोबत गप्पा मारत बसलेल्या युवकांची निर्घृण हत्यापुणे – पुण्यातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात दारूची बॉटल आणि झाडाची कुंडी घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. Pu2 hours agoसुकेश हा तिहार जेलमध्ये असताना बॉलीवूडमधील काही अभिनेत्री त्याच्या भेटीसाठी गेल्या होत्या. अशी धक्कादायक बातमी समोर आली होती. त्यात नोराच्या नावाचा समावेश होता. पिंकी विरानीनं सगळ्या अभिनेत्रींची सुकेशसोबत ओळख करुन दिली होती. दोन दिवसांपूर्वी जॅकलीनच्या हेअर स्टाईलिस्टनं मोटा खुलासा केला होता. जॅकलीनला कपडे घेण्यासाठी सुकेशनं तीन कोटी रुपये दिल्याची चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून सुकेश चंद्रशेखर प्रकरण चर्चेत आले आहे. त्यात बॉलीवूडच्या अभिनेत्रींची नावं समोर आल्यानं त्याला वेगळं वळण मिळालं आहे.अजुन ईडीनं कुणाला ताब्यात घेतलं नसलं तरी बॉलीवूडच्या अभिनेत्रींना चौकशीसाठी बोलावून घेतलं होतं. येत्या काळात बॉलीवूडसमोर आणखी काही मोठे प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर अनेकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतले होते. त्यात दीपिकापासून सारा अली खान यांच्या नावाचा समावेश होता. आता सुकेशचे प्रकरण चर्चेत आले असून पैशांचा हव्यास अभिनेत्रींना भोवला असल्याचे सांगितले जात आहे.हेही वाचा: Viral Video : प्रियांका चोप्राने पती निक जोनासला स्टेजवर केले KISSस्टाईलिश लाईफस्टाईल, ग्लॅमरस दुनियेची पडलेली भुरळ याचा परिणाम अनेकदा सेलिब्रेटींच्या लाईफस्टाईलवर होत असल्याचे दिसून आले आहे. जॅकलीन, नोरा यांच्यासह निक्की तांबोळी, चाहत खन्ना, सोफिया सिंग आणि आरुषी पाटील यांचीही नावं पुढं आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या अभिनेत्रींना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. त्यातून कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हेही वाचा: National Cinema Day: तिकीट कमी काय केलं थिएटर तुडूंब! 65 लाख प्रेक्षकांची गर्दी