Team India : बुमराह अन् रोहितमुळे दिलासा मात्र, हर्षलचा गंडलेला फॉर्म अजूनही चिंतेचे कारण
क्रीडा

Team India : बुमराह अन् रोहितमुळे दिलासा मात्र, हर्षलचा गंडलेला फॉर्म अजूनही चिंतेचे कारण

नागपूर मधील स्टेडियमवर शुक्रवारी ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पुनरागमन केले आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. आठ-आठ षटकांच्या या सामन्यात टीम इंडियासाठी अनेक गोष्टी चांगल्या झाल्या तर अनेक वाईटही झाल्या. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुनरागमन केले. कर्णधार रोहित शर्मा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला. त्याचबरोबर काही खेळाडूंच्या कामगिरीनेही संघाची चिंता वाढवली.सामन्यात काय घडलं -टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आठ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 90 धावा केल्या. मॅथ्यू वेडने सर्वाधिक 43 धावांची नाबाद खेळी खेळली. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक दोन बळी घेतले.प्रत्युत्तरात भारताने 7.2 षटकांत चार गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. रोहितने 20 चेंडूत नाबाद 46 धावांची नाबाद खेळी खेळली. दिनेश कार्तिकने 2 चेंडूत 10 धावा करून सामना जिंकून दिला. Recommended Articlesमहामार्गावरील खड्ड्यांवर खडीची मात्रा;
‘सकाळ’च्या वृत्तानंतर काम सुरूमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव -धुळे रस्त्यावरील तरवाडे बारीपासून ते चाळीसगाव बायपासपर्यंत रस्त्यावरील पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे दररोजच अपघात होत आहेत. या संदर्भात ‘सकाळ’ने शनिवारच्या (ता.२४) अंकात वृत्त प्रसिद्ध करताच राष्ट्रीय प्राधिकरण विभाग खडबडून जागा झाला असून, खडी टाकून ख3 hours agoNavratri : तुम्हाला नवरात्र व्रताचे प्रकार माहीत आहे का? जाणून घ्या शास्त्रीय महत्व Navratri 2022 : अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्रोत्सव सुरु होत आहे. या काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात. नवरात्र व्रताचे विविध प्रकार असतात यानुसार नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. नवरात्र व्रताचे विविध प्रकार यांसह नवरात्रात केल्या जाणाऱ्या 3 hours agoभरदिवसा वृद्धेची पर्स पळवली मखमलाबाद रोडवरील प्रकार; घटना CCTVमध्ये कैदनाशिक : भाजीपाला खरेदी करून घराकडे परतणाऱ्या पादचारी वृद्धेची पर्स पाठीमागून आलेल्या चोरट्याने बळजबरीने खेचून पोबारा केल्याचा प्रकार घडला. मखमलाबाद रोडवर भरदिवसा घडलेला सदरचा प्रकार एका इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.(Thieves snatching elder woman purse on Makhmalabad Road was cau3 hours agoपोस्ट ऑफिसची डबल मनी स्कीम, विना टेन्शन कमवा दुप्पट नफा…पोस्ट ऑफिससोबत केंद्र सरकार गुंतवणूक आणि बचतीच्या अनेक योजना चालवते. यात परतावा चांगला मिळतोच शिवाय कोणत्याही प्रकारची रिस्क नाही. तुमचे पैसे पोस्टात अतिशय सुरक्षित असतात. पोस्ट ऑफिसच्या काही स्कीम्समध्ये, फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त व्याजाने पैसे मिळतात. तर काही योजना दीर्घकालीन गुंतवणुकी3 hours agoरोहित शर्माचे फॉर्ममध्ये तर जसप्रीत बुमराहचे पुनरागमन भारतासाठी दिलासादायक -भारतीय कर्णधार रोहित शर्माने काल ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यावरून असे वाटत होत की, तो जुन्या शैलीत परत आला आहे. रोहितने स्फोटक खेळी करत चार चौकारांसह चार षटकारही ठोकले. 20 चेंडूत 46 धावांच्या नाबाद खेळीत त्याचा स्ट्राइक रेट 230.00 होता. तब्बल सात-आठ महिन्यांनंतर त्याने अशी फलंदाजी केली आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी हे चांगले संकेत आहेत.भारताचा सर्वात महत्त्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या सामन्यात पुनरागमन केले. त्याने दोन षटकांत 23 धावा दिल्या. इतक्या धावा देऊनही बुमराहने आपल्या यॉर्करने प्रभावित केले. कालच्या सामन्यात कांगारूंचा कर्णधार फिंचचा अशाच एका यॉर्करवर क्लीन बोल्ड केला. यामुळे बुमराहचा फॉर्म खराब नाही यावर लोकांचा विश्वास बसला. आणखी दोन सामने खेळल्यानंतर तो पूर्णपणे लय मिळवेल.हर्षल पटेलमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली -नागपूर मध्ये खेळला गेलेला दुसरा टी-20 सामन्यात हर्षल पटेल सर्वात महागडे ठरला. त्याने दोन षटकांत 32 धावा दिल्या. आयपीएलमध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध झालेला हर्षल दुखापतीतून परतल्यानंतर लय मध्ये दिसत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमन करताना दोन्ही सामन्यात त्याला यॉर्कर नीट टाकता आला नाही. त्याला टी-20 विश्वचषक संघात स्थान देण्यात आले असून तो संघाचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. अशा परिस्थितीत हर्षलला लवकरच फॉर्ममध्ये परतावे लागणार आहे. नाहीतर टीम इंडियाची डोकेदुखी अजूनच वाढेल.