Tata Group च्या ‘या’ 2 स्‍टॉक्‍समधून कराल तगडी कमाई
अर्थविश्व

Tata Group च्या ‘या’ 2 स्‍टॉक्‍समधून कराल तगडी कमाई

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी यूएस फेडने सलग तिसऱ्यांदा व्याजदर वाढवल्यानंतर जागतिक बाजारात कमालीची अस्थिरता आहे. बाजारातील या अस्थिरतेच्या काळात आणि सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी काही दर्जेदार स्टॉक्स पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करायची आता चांगली संधी आहे. या सगळ्यात भरवश्याची कंपनी टाटा ग्रुपच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे ठरेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. टाटा ग्रुपचा ऑटो स्टॉक टाटा मोटर्स आणि टायटन कंपनीबाबत ब्रोकरेज हाऊसने आपले रेटींग दिले आहे. या दोन्ही शेअर्सच्या सध्याच्या किंमतीनुसार आता गुंतवणूक केल्यास 25 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.हेही वाचा: TATA ग्रुपच्या ‘या’ शेअरने 3 महिन्यात गुंतवणुकदारांचे पैसे केले दुप्पट…टाटा मोटर्स (Tata Motors)इक्विटी रिसर्च फर्म एडलवाइज सिक्युरिटीजने (Edelweiss Securities) अलीकडेच टाटा मोटर्सच्या मॅनेजमेंटशी चर्चा केली. मॅनेजमेंटचा आउटलूक चांगला असल्याचे समोर आले. FY24 नेट ऑटो डेट आणि JLR EBIT मार्जिन / FCFगायडंसबाबत एक मजबूत योजना असल्याचे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे. येत्या काळात सप्लाय चेनमध्ये सुधारणा आहे, JLR साठी सप्लाय चांगला आहे. India MHCV साठी कंपनीचा आऊटलूक चांगला आहे. पॅसेंजर व्हेहीकलमध्ये ईव्हीची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम या स्टॉकवर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पेट्रोल-डिझेल वाहनांसाठी सिंगल डिजिट मार्जिन आणि व्हॉल्यूम वाढ यावर कंपनीने फोकस केले आहे.Recommended Articlesरात्रीच्या शिळ्या डाळीपासून हे पदार्थ करारात्रीची शिळी डाळ फेकण्यापेक्षा त्यापासून इतर पदार्थ तयार करता येतील. 2 hours agoरश्मिका मंदानाने वाढवले पुन्हा फॅन्सच्या हृदयाचे ठोके…दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाची फॅन फॉलोइंग खूपच मोठी आहे.2 hours agoKuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तरKuldeep Yadav Hat-Trick : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कधी भारतीय संघात दिसतो तर कधी नाही. जरी संघात असला तरी त्याला मालिकेतील सर्व सामन्यात खेळण्याची संधी मिळले याची शाश्वती नसते. मात्र भारतीय ‘अ’ संघाकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवने निवडसमिती आणि संघ व्यवस्थापनाला आपल्याबाबत नव्याने व2 hours agoत्या वक्तव्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाणांनी गमावले ?डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरुन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. मंत्री चव्हाण यांच्या डोंबिवलीतील त्या वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज झाला आहे. डोंबिवलीतील शिंदे गटासह ठाकरे गटाने देखील चव्हाण यांच्यावर रस्ते कामावरुन टिकेची 2 hours agoहेही वाचा: Tata motors : ‘पॉवर ऑफ 6’ चे मुंबईत आयोजनत्यामुळेच एडलवाईसने स्टॉकवरील बाय रेटींग कायम ठेवले आहे. तसेच, टारगेट 514 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, जागतिक ब्रोकरेज हाऊस HSBC ने टाटा मोटर्सवर प्रति शेअर 540 रुपयांचे टारगेट ठेवून खरेदी सल्ला कायम ठेवला आहे. 22 सप्टेंबरला टाटा मोटर्सची किंमत 432 रुपयांवर होती. अशा प्रकारे, सध्याच्या किमतीपासून स्टॉकमध्ये 25 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा मिळू शकतो. गेल्या एका वर्षात आतापर्यंत स्टॉकमध्ये जवळपास 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे.हेही वाचा: Tata-Airbus Project : वेदांता गुजरातला जाताच राज्य सरकारला खडबडून जाग; हालचालींना वेगटायटन कंपनी (Titan Company)ग्लोबल ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीने टायटन कंपनी लिमिटेडच्या स्टॉकवर ओव्हरवेटचे रेटिंग कायम ठेवले आहे. तसेच, टारगेट 2800 रुपयांवरून 2902 रुपये प्रति शेअर करण्यात आली आहे. 22 सप्टेंबर 2023 च्या शेअरची किंमत 2738 वर होती. अशाप्रकारे, स्टॉकमध्ये सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 6 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. गेल्या एका वर्षात आतापर्यंत स्टॉकमध्ये जवळपास 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.