बाजाराच्या अस्थिरतेत ‘हा’ शेअर देईल दमदार कमाई, तज्ज्ञांचा सल्ला
अर्थविश्व

बाजाराच्या अस्थिरतेत ‘हा’ शेअर देईल दमदार कमाई, तज्ज्ञांचा सल्ला

चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी यूएस सेंट्रल बँकेने व्याजदरात 75 बेसिस पॉईंट्सने वाढ केल्यानंतर आता बाजारात थोडी रिकव्हरी दिसून येत आहे. पण तरीही बाजारात चढ-उतार सुरुच असतात. बाजाराच्या याच अस्थिरतेदरम्यान तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी मजबूत शेअरच्या शोधत असाल, तर तुम्ही बाजार तज्ञ संदीप जैन यांच्या सल्ल्याचा विचार करु शकता.बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी खरेदीसाठी अपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (APCOTEX INDUSTRIES LTD) निवड केली आहे. गुरुवारी बाजारात मोठी घसरण झाली, तेव्हा हा स्टॉक हिरव्या चिन्हात होता. या कंपनीची मार्केट कॅपिटल 3100 कोटींचे आहे.

अपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (APCOTEX INDUSTRIES LTD)
सीएमपी (CMP) – 614.80 रुपये
टारगेट (Target) – 690 रुपये
Recommended ArticlesAxar Patel : मॅक्सवेल बाद! अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत0 minutes agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.2 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : कांगारूंचा निम्मा संघ माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म10 minutes agoMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज18 minutes agoकंपनी काय करते ?

अपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी 1984 मध्ये एशियन पेंट्सची एक डिव्हिजन म्हणून सुरू झाली. पण नंतर ही कंपनी वेगळी झाली. ही कंपनी सिंथेटिक रबर बनवणारी आघाडीची कंपनी आहे. रबरशी निगडीत उत्पादनांमध्ये चांगले वातावरण असून, त्याचा फायदा कंपनीला होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कंपनीचे फंडामेंटल ?
अपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा  (APCOTEX INDUSTRIES LTD) स्टॉक 27 च्या PE मल्टिपलवर काम करतो. याशिवाय रिटर्न ऑन इक्विटी 28 टक्के आहे. कंपनी सुमारे 1 टक्के डिव्हिडेंड यील्ड देते. कंपनी सतत आपल्या ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनमध्ये घट करत आहे.

जून 2021 मध्ये कंपनीने 22 कोटी रुपयांचा नफा कमावला होता, तर जून 2022 मध्ये 34 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. या कंपनीत देशी-विदेशी गुंतवणूकदारांचे भागभांडवल वाढत असून त्यात सरकारचाही काही हिस्सा आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.