Tiger Shroff : युजरने हिरोपंती २ वर विचारला प्रश्न; टायगरने दिले ‘हे’ उत्तर…
सिनेमा

Tiger Shroff : युजरने हिरोपंती २ वर विचारला प्रश्न; टायगरने दिले ‘हे’ उत्तर…

Tiger Shroff Latest News बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) उत्कृष्ट नृत्य आणि मजबूत शरीरासाठी देखील ओळखला जातो. टायगर अनेकदा फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो. यावेळी टायगरने चाहत्यांसह #ASK सत्र आयोजित केले आणि काही निवडक प्रश्नांची उत्तरे दिली. एका चाहत्याने टायगरला हिरोपंती २ बद्दल विचारले. अभिनेत्याने अगदी थेट आणि सत्य उत्तर दिले जे चाहत्यांना आवडले.#ASK अंतर्गत इंस्‍टाग्राम स्टोरीजवर टायगर श्रॉफने (Tiger Shroff) चाहत्यांच्या काही निवडक प्रश्नांची उत्तरे दिली. एका चाहत्याने विचारले की, हिरोपंती २ करताना तुम्हाला कसे वाटले? यावर टायगर म्हणाला, रिलीजपूर्वी खूप मजा आली. मात्र, रिलीजनंतर L… लागले. टायगर श्रॉफचा प्रामाणिकपणा सोशल मीडिया युजर्सना खूप आवडला आहे.Recommended ArticlesKhambhatki Ghat: खंबाटकी घाटात दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगापुणे-बंगळुरू महामार्गावर रविवारी दुपारी खंबाटकी घाटात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवासी बऱ्याच वेळापासून वाहनात अडकून पडले आहेत. (khambhatki ghat news in Marathi)सविस्तर वृत्त थोड्याच वेळा…3 hours agoPune : कात्रज तलावात बूडून एकाचा मृत्यूकात्रज : नानासाहेब पेशवे तलावात एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी काही तरुण निघाले होते. त्यावेळी काहीजण बोटीने पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचले. मात्र, ज्ञानेश्वर पांचाळ (वय4 hours agoJalgaon : रस्त्यावरील खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी मोठा वाघोदा (ता. रावेर) : महामार्गावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी गेल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) घडली. वाघोदा बुद्रुक येथील नारायण साहेबराव धामोडे (वय ३३) हा रात्री काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला होता.(young man killed in accident due to potholes on road jalgaon latest news)4 hours agoManmad : रेल्वेकडून ज्येष्ठांच्या खिशाला कात्री! प्रवासातील सवलतींअभावी भुर्दंड मनमाड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानमित्त एसटी महामंडळाने ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. तर दुसरीकडे मात्र रेल्वे प्रशासनाकडून दिली जाणारी तिकीट दरातील सवलत अद्यापही बंद असल्याने ज्येष्ठांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेल4 hours agoहेही वाचा: KRK : विक्रम वेधानंतर कोणत्याही चित्रपटाचे समीक्षण करणार नाही; नेटकरी म्हणाले…सोशल मीडिया युजर्सना टायगरचे हे उत्तर खूप आवडले आणि त्याला पुढील चित्रपट काळजीपूर्वक निवडण्याचा सल्ला दिला आहे. काही युजर्सने यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एकाने लिहिले, जॅकी दादा, तू टायगरचे अकाऊंट चालवणे बंद कर. दुसऱ्याने लिहिले की, भाऊ, काळजी घे. प्रत्येक वेळी उडी मारण्यात काहीही ठेवले नाही.टायगर श्रॉफने २०१४ मध्ये हिरोपंती या चित्रपटातून पदार्पण केले होते. चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. टायगरला लूकसाठी ट्रोल केले होते. मात्र, अ‍ॅक्शन आणि शरीरयष्टीसाठी खूप टाळ्या वाजल्या. यानंतर टायगरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. टायगरचा सर्वांत मोठा हिट वॉर ठरला आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत हृतिक रोशनही होता.हिरोपंती २ फ्लॉपटायगर श्रॉफचा हिरोपंती २ हा चित्रपट २९ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ना प्रेक्षकांना आवडला नाही. चित्रपटाने पहिल्या दिवशी ६.५० कोटींचा गल्ला जमवला होता. तर चित्रपटाची एकूण कमाई ५० कोटी होती. टायगरसोबत या चित्रपटात तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.