“आजचा काळ हा युद्धाचा नाही”; पुतिन यांच्याशी भेटीदरम्यान मोदींनी मांडली भूमिका
ताज्या बातम्या

“आजचा काळ हा युद्धाचा नाही”; पुतिन यांच्याशी भेटीदरम्यान मोदींनी मांडली भूमिका

नवी दिल्ली : आजचा काळ युद्धाचा नाही, येणाऱ्या काळात शांततेच्या मर्गावर आपल्याला पुढे जावं लागेल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उझबेकिस्तानातील समरकंद इथं सुरु असलेल्या एसओएस समिटमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान मोदींनी आपली भूमिका मांडली. (Today is not a time of war PM Modi expressed his sentiments during meeting with Putin)यावेळी मोदी म्हणाले, “मला रशिया आणि युक्रेनचे आभार मानायचे आहेत. कारण युद्धाच्या संकटकाळात सुरुवातीला आमचे हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. तुम्हा दोन्ही देशांमुळं त्यांना सुखरुप भारतात आणण्यात आलं. मला जाणीव आहे की आजचा काळ हा युद्धाचा नाही. यापूर्वीही फोनवरुन मी तुमच्यासोबत अनेकदा लोकशाही, रणनीती तसेच संवाद यावर चर्चा केली आहे. या सर्व गोष्टी जगाला स्पर्शून जातात. त्यामुळं येणाऱ्या काळात शांततेच्या मार्गावरुन आपण कसे पुढे जाऊ यावर आपण चर्चा करायला हवी. याबाबतचा आपला दृष्टीकोन जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे” Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी20 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 20 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म24 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.37 minutes agoहेही वाचा: राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; पाहा कोणाला मिळालं स्थान? कोणाला डच्चू? दरम्यान, भारत आणि रशियाचे संबंध अनेक पटीनं वाढले आहेत. आपण कायमच असे मित्र राहिलो आहोत जे गेल्या अनेक देशकांपासून एकमेकासोबत आहेत. व्यक्तीगत स्वरुपात सांगतो की आपल्या दोघांचा प्रवास एकत्रच सुरु झाला. आजची आपली भेट आणि चर्चा ही येणाऱ्या काळातील आपले संबंध अधिक गहिरे करतील आणि जगातील समस्या सोडवण्यासाठी उपयोगी ठरेल अशी मला आशा वाटते, अशा शब्दांत पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभार मानले. अन्न, तेल, खतांच्या सुरक्षेची जगाला सध्या चिंता”डिसेंबरमध्ये तुम्ही भारतात आला होतात तेव्हा अनेक विषयांवर आपली चर्चा झाली होती. त्यानंतर आज पुन्हा आपली भेट होत आहे. जगासमोर विशेषतः विकसीत देशांसमोर आज सर्वात मोठी चिंता आहे ती अन्न, तेल आणि खतांच्या संरक्षणाची. आपल्याला यामध्ये जरुर मार्ग काढावे लागतील तुम्हालाही यासाठी उपाय शोधावे लागतील, असंही मोदी यावेळी म्हणाले.