भारताला सदस्यत्व नसणे योग्य नाही; एस. जयशंकर
ताज्या बातम्या

भारताला सदस्यत्व नसणे योग्य नाही; एस. जयशंकर

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये भारत नसणे हे या जागतिक संस्थेसाठी योग्य नाही आणि या समितीच्या रचनेत सुधारणा आवश्‍यक असून त्यासाठी प्रचंड विलंब झाला आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज ठामपणे सांगितले. या समितीमध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही जयशंकर यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी जयशंकर हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज कोलंबिया विद्यापीठातील एका कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी बोलताना जयशंकर म्हणाले की,‘‘संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा करण्याच्या मागणीत भारत आघाडीवर आहे. बदलत्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे ही सुधारणा अत्यावश्‍यक असून ती अनेक वर्षे आधीच होणे अपेक्षित होते. सुरक्षा समितीचा कायमस्वरुपी सदस्य होण्यास भारत अत्यंत पात्र देश आहे.’’ सुरक्षा समितीमध्ये सध्या पाच कायमस्वरुपी आणि १० अस्थायी सदस्य देश आहेत. अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स हे पाच कायमस्वरुपी सदस्य असलेले देश कोणत्याही मुद्द्यावर व्हेटो अधिकार वापरू शकतात. बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार इतरही देशांना या समितीत स्थान मिळणे आवश्‍यक आहे, अशी भारताची भूमिका आहे.भारत हा महत्त्वाचा देश : ब्रिटनजागतिक राजकारणात भारत हा अत्यंत महत्त्वाचा देश असून भौगोलिक आकार, अर्थव्यवस्था आणि इतर देशांवर असलेला प्रभाव पाहता या देशाने अधिक मोठी भूमिका निभावल्यास ब्रिटनचा त्यांना पाठिंबा असेल, असे ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्वेव्हरी यांनी आज आमसभेत बोलताना सांगितले. सुरक्षा समितीच्या कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी त्यांनी भारताला पाठिंबाही व्यक्त केला.Recommended Articlesपाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात शनिवारी पुण्यात आंदोलन केलं. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अक्षरच्या थेट फेकी मॅक्सवेल बाद; कांगरूंची धावगती मंदावली IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 1 hours agoडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क1 hours agoअमेरिकेचा भारताला पाठिंबावॉशिंग्टन : सुरक्षा समितीमधील कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी अमेरिकेचा भारतासह जर्मनी आणि जपानला पाठिंबा आहे, असे ‘व्हाइट हाऊस’तर्फे आज जाहीर करण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही आमसभेतील त्यांच्या भाषणात संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा घडवून आणण्यास पाठिंबा व्यक्त केला आहे. बदलत्या जगाला आणि नव्या समस्यांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी सर्वांना सहभागी करून घेणे अधिक फायदेशीर आहे, असे बायडेन यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.