Video : चीनमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; जवळपास सर्व मजले आगीच्या भक्षस्थानी
ताज्या बातम्या

Video : चीनमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; जवळपास सर्व मजले आगीच्या भक्षस्थानी

चांगशा : चीनमध्ये एका गगनुचंबी इमारतीला भीषण आग लागल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. २०० मीटर उंचीच्या या इमारतीचे जवळपास सर्वच मजले या आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. पहिल्या मजल्यापासून शेवटच्या मजल्यापर्यंत उठणाऱ्या ज्वाळा पाहून धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. (Video Huge fire at tallest building in China almost all floors are on fire)रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनमधील टेलिकॉम कंपनीच्या बिल्डिंगला भीषण आग लागली. २०० मीटर अर्थात ६५६ फूट उंचीच्या या इमारतीचे डझनावर मजल्यांना या आगीनं वेढलं आहे. या आगीमुळं आकाशात उंच दाट धुराचं साम्राज्य पसरलं आहे. चीनच्या हुनान या दक्षिण प्रांताची राजधानी चांगशा इथं ही दुर्घटना घडली आहे. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत पण यामध्ये जीवितहानी झालीए का? याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी20 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 20 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म24 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.37 minutes ago