Russia and Ukraine War : पुतीन यांच्या विरोधात रशियात जोरदार निदर्शने
ताज्या बातम्या

Russia and Ukraine War : पुतीन यांच्या विरोधात रशियात जोरदार निदर्शने

मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात व्लादिमीर पुतीन यांनी रशियाचे राखीव सैन्य उतरवण्याची घोषणा केल्यानंतर रशियामध्ये विविध ठिकाणी त्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने सुरू झाली आहेत. पुतीन यांनी २१ सप्टेंबरला रशियाचे चार लाख राखीव सैन्य युद्धात उतरवण्याची घोषणा केल्यानंतर मॉस्को, सेंट पीट्सबर्गसह ३८ शहरांत हजारो नागरिकांनी रस्त्यावर येत ‘नो टू वॉर’ अशा घोषणा देत, पुतीन यांच्या विरोधात निदर्शने केली. काही ठिकाणी पोलिस आणि निदर्शकांत बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. यावेळी निदर्शकांना पांगवण्यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. या निदर्शनादरम्यान पोलिसांनी संपूर्ण देशभरात तेराशेहून अधिक नागरिकांना ताब्यात घेतले असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. तसेच पोलिसांनी निदर्शने करणाऱ्यांना शांततेचे आवाहन करत घरी परत जाण्याच्या सूचना देखील दिल्या. मात्र निदर्शने तीव्र होत गेल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. दरम्यान, पुतीन यांच्याविरुद्धच्या निदर्शनांवेळी पोलिसांनी काही महिलांना फरपटत नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यामुळे पोलिस यंत्रणेवर टीका होत आहे.Recommended ArticlesMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज1 hours agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु1 hours agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours ago