Cleaning Tips : ‘या’ टिप्सनं Washing Machine करा झटपट स्वच्छ
लाइफस्टाइल

Cleaning Tips : ‘या’ टिप्सनं Washing Machine करा झटपट स्वच्छ

Home Remedies For Cleaning Washing Machine: मशिन व्यवस्थित कोरडं होऊ न देता लगेच झाकण लावल्याने त्यावर बुरशीही येते. कपडे स्वच्छ धुणारं वॉशिंग मशिनच कधी कधी एकदम कळकट होऊन जातं. म्हणूनच कमी मेहनतीत ते कसं झटपट स्वच्छ करायचं याचे हे काही खास उपाय.हेही वाचा: Cleaning Tips : गौरी-गणपतीला वापरलेली तांब्या पितळेची भांडी ‘अशी’ करा लख्ख!टॉप लोड वॉशिंग मशिन स्वच्छ करण्याचे उपाय१. व्हिनेगरच्या मदतीने वॉशिंग मशिन अगदी नव्यासारखे चमकवता येते. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी मशिनला हॉट टेम्परेचरवर सेट करा.यानंतर मशिनमध्ये गरम पाणी टाका. त्यात साधारण ५ ते ६ टेबलस्पून एवढं व्हाईट व्हिनेगर टाका. मशिन खूप जास्त घाण झालं नसेल तर व्हिनेगर टाकणं पुरेसं आहे. पण जर मशिन खूपच काळवंडलं असेल तर मात्र व्हिनेगरसोबतच त्यात साधारण २ ते ३ टेबलस्पून एवढा बेकिंग सोडाही टाकावा.Recommended Articlesभारतीयांसाठी व्हीएटनामचे ‘चाओ मुंग’मुंबई : कोरोनाचा कालखंड मागे पडल्यानंतर व्हिएतनाम या पॅसिफिक महासागराचा शेजार लाभलेल्या देशाने भारतीय पर्यटकांचे स्वागत (चाओ मुंग) करण्यासाठी अनेक सोयीसुविधा देऊ केल्या आहेत. तेथील अनेक आकर्षक पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सज्ज झाली आहेत. 2 hours agoNashik : शेतमाल विक्रीसाठी तारेवरची कसरत; कुंदर वस्ती शिवारातील विदारक चित्र नामपूर : गेल्या सहा- सात महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला बाजार समित्यांमध्ये भाव मिळत नसल्याने कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून कांद्याची विक्री सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कांद्याची विक्री करण्यासाठी निताणे (ता. बागलाण) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जीव धोक्यात घ2 hours agoNashik : डाऊनी कोबीच्या मुळावर शेतकऱ्यांची चिंता वाढली देवळा: कसमादे भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात कोबी लागवड झाली असली तरी या पिकावर डाऊनी रोगाने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. अतिवृष्टीने लाल कांद्याची रोपे व टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकाचे आधीच नुकसान झाले असून, चाळीत साठवणूक करून ठेवलेला उन्हाळी कांदाही2 hours agoIND vs AUS 3rd T20I : निर्णायक सामन्यावर फिरणार पाणी; हैदराबादमध्येही पावसाची शक्यता? IND vs AUS 3rd T20I Hyderabad Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्य2 hours agoहेही वाचा: Iron Cleaning : कपडे जळून प्रेस (इस्त्री) खराब झाली असेल तर साफ करण्यासाठी सोप्या टिप्स२. हे दोन्ही टाकल्यानंतर ५ ते १० मिनिटांसाठी मशिन सुरू करा. त्यानंतर पुढचा एक तास मशिन झाकण लावून बंद ठेवा. त्यानंतर पुन्हा ५ मिनिटांसाठी मशिन चालू करा आणि नंतर मशिनमधले हे पाणी काढून टाका. पाणी निघून गेल्यानंतर एका कोरड्या सुती कपड्याने मशिन स्वच्छ पुसून घ्या.हेही वाचा: Floor Cleaning Tips : घरातील फरशी अशी करा स्वच्छ; दूर होईल पिवळेपणा३. सेमी ऑटोमॅटीक मशिनजर तुमचे मशिन सेमी ऑटोमॅटीक प्रकारातले असेल किंवा ऑटोमॅटीक मशिन बाहेरच्या बाजूने स्वच्छ करायचे असेल तर ही पद्धत वापरू शकता. यासाठी साधारण एक मग पाणी घ्या. त्यात ३ ते ४ टेबलस्पून व्हिनेगर आणि २ ते ३ टेबलस्पून बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण मशिनवर आतून बाहेरून शिंपडा. ५ ते ७ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. रबरच्या घासणीने घासूनही तुम्ही स्वच्छ करू शकता. पण खूप जोरजोरात घासू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *