Rahul Dravid : नागपूर… पाऊस… अन् सासूरवाडीवरून जाफरने राहुल द्रविडला काढला चिमटा
क्रीडा

Rahul Dravid : नागपूर… पाऊस… अन् सासूरवाडीवरून जाफरने राहुल द्रविडला काढला चिमटा

Wasim Jaffer Trolls Coach Rahul Dravid : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ओल्या मैदानामुळे नाणेफेक दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाली. यादरम्यान मैदानावरील कामगार विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या काही भागाची दुरुस्ती करण्यात गुंतले होते. दरम्यान भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने प्रशिक्षक राहुल द्रविडबद्दल एक मजेशीर ट्विट केले आहे.पावसामुळे सामन्याला उशीर झाल्यामुळे जाफरने द्रविडला ट्रोल केले. जाफरने ट्विट करून लिहिले की, जेव्हा तुम्ही ठराविक वयानंतर सासरच्या जागी जाता तेव्हा गोष्टी वेळेवर सुरू होतातच असे नाही. यासोबतच त्याने हसणारे इमोजी बनवले असून आहे. द्रविडची पत्नी विजेता हिचा जन्म नागपुरात झाला आहे. निवृत्तीनंतर विजेताचे वडील कुटुंबासह नागपुरात स्थायिक झाले.Recommended ArticlesAmey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली Amey Wagh Vs Sumeet Raghwan: अभिनेता अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय. आज दिवसभर या दोन्ही अभिनेत्यांमधील वादानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु आहे हे मात्र नेटकऱ्यांना समजलेलं नाही. अनेकांना हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटते1 hours agoभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना हे नियम पाळातुम्हाला भरपूर भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवायची सवय असेल तर काही नियम पाळा. 1 hours agoतळेगाव ढमढेरे येथे मिरवणुकी अभावी बैलपोळा साजरातळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे येथे लंपी आजाराच्या भीतीमुळे सर्व शेतकऱ्यांनी मिरवणूक न काढता व कसल्याही प्रकारचा डमडोल न करता साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला. बैल पोळ्यानिमित्त बैलाला पाण्याने अंघोळ घातली, रंग दिला, तसेच महिलांनी पारंपारिक पद्धतीने बैलांची पूजा करून पुरणपोळीचा घास बैलांन1 hours agoNana Patole on Devendra Fadanvis : मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही करत हे आता कळालं? पाटोळेंचा टोमणा३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्ष चांगलीच खिल्ली उडवत आहेत, यातच नाना पाटोळे यांनी फडवीसांना चांगलाच टोमणा केला.1 hours agoहेही वाचा: Video : केवळ 2 बॉल खेळणारा कार्तिकचं मॅचविनर; पंत का आला नाही रोहितचा खुलासाहेही वाचा: Dinesh Karthik : 2 बाॅलमध्येच संपवली मॅच; परफेक्ट फिनिशर म्हणाला, मी कोणतंही श्रेय…पावसाने व्यत्यय आणलेल्या या 8 षटकांच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने आठ षटकांत 5 गडी गमावून 90 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने 20 चेंडूत 43 तर कर्णधार फिंचने 15 चेंडूत 31 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने 2 विकेट्स घेतल्या.भारताचा कर्णधार रोहित शर्माने कॅप्टन्स इनिंग खेळत भारताला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला. भारताने ऑस्ट्रेलियाचे 91 धावांचे आव्हान 7.2 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. रोहित शर्माने 20 चेंडूत नाबाद 46 धावा केल्या. दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच दोन चेंडूवर एक षटकार एक चौकार मारत सामना संपवला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1 – 1 अशी बरोबरी केली.