काळा दिवस; भारतीय फुटबॉलसाठी यापेक्षा काय वाईट होणार? वर्ल्डकपचे यजमानपद गमावले आणि…
क्रीडा

काळा दिवस; भारतीय फुटबॉलसाठी यापेक्षा काय वाईट होणार? वर्ल्डकपचे यजमानपद गमावले आणि…

नवी दिल्ली: भारतासाठी आणि देशातील फुटबॉल चाहत्यांसाठी यापेक्षा वाईट काय होऊ शकते? युपीए सरकारमध्ये मंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल १३ वर्ष भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष होते. देशातील क्रीडा धोरण स्पष्टपणे सांगते की कोणतीही व्यक्ती ३ पेक्षा अधिक काळ अध्यक्षपदावर राहू शकत नाही. पटेल यांना सक्तीने या पदावरून दूर व्हावे लागले.
अध्यक्षपद सोडताच पटेल यांनी राजकारण सुरू केले. राज्य संघटनांना हाताशी धरून त्यांनी निवडणुका होऊ दिल्या नाहीत. एका बाजूला पटेल निवडणुका अडवतात आणि दुसऱ्या बाजूला फिफा भारतीय महासंघावर बॅन करण्याचा प्रयत्न सुरू करते. फिफाकडून सातत्याने धमकी दिली जात होती आणि अखेर सोमवारी रात्री त्यांनी तसा निर्णय देखील घेतला.
फुटबॉल महासंघाच्या निवडणुका न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नियुक्त केली होती. पण नियमानुसार देशात फुटबॉल चालवणारी नियमीत संघटना नसेल तर त्याची मान्यता धोक्यात येते. फिफाच्या बंदीचा अर्थ या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणारी १७ वर्षाखालील महिला वर्ल्डकपचे भारताचे आयोजकपद काढून घेण्यात आले.
फिफाच्या या बंदीचा अर्थ आता भारतीय फुटबॉल संघ कोणत्याही आंतरारष्ट्रीय स्पर्धेत खेळू शकणार नाही. परदेशी खेळाडू ISL सारख्या स्पर्धेत खेळण्यासाठी भारतात येणार नाही. अर्थात २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर काय होते हे पाहावे लागले.

भारतीय फुटबॉलवर काय परिणाम होणार

या वर्षी भारतात महिला १७ वर्षाखालील फुटबॉल वर्ल्डकप होणार होता. पण आता तो धोक्यात आलाय. बंदीमुळे भारतातील फुटबॉलवर संपूर्णपणे रोख होय. पुढील वर्षी भारतात AFC आशिया कप देखील होणार आहे. बॅनमुळे भारतीय संघ कोणत्याही स्पर्धेत खेळू शकणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या कार्यकारी समितीला पदापासून हटवले आणि महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी प्रशासकिय समिती नियुक्ती केली होती. पटेल यांनी डिसेंबर २०२० मध्ये अध्यक्ष म्हणून १२ वर्ष पूर्ण केली होती. क्रीडा धोरणानुसार एका राष्ट्रीय खेळाच्या महासंघाच्या अध्यक्षपदी इतका काळ थांबता येत नाही.