Windows 11 : सर्वात सुरक्षित आवृत्ती लॉंच; वाचा फीचर्स, अपडेट करण्याची पध्दत
इन्फोटेक

Windows 11 : सर्वात सुरक्षित आवृत्ती लॉंच; वाचा फीचर्स, अपडेट करण्याची पध्दत

Windows 11 2022 Update : मायक्रोसॉफ्टने आपल्या Windows 11 चे 2022 अपडेट जारी केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे अपडेट जगभरातील 190 देशांमध्ये एकाच वेळी जारी करण्यात आले आहे. विंडोज 11 लाँच झाल्यापासून आतापर्यंतचे हे सर्वात मोठे अपडेट आहे. मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे की या अपडेटमध्ये वापर, प्रोडक्टिव्हीटी, कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा या चार मुख्य भागांवर लक्ष केंद्रित केले आहे. म्हणजेच लेटेस्ट अपडेटमध्ये तुम्हाला या सर्व फीचर्समधील बदल पाहायला मिळतील. तसेच स्टार्ट मेनूमध्ये Quick Settings चा पर्याय देखील समाविष्ट करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Windows 11 2022 अपडेटची वैशिष्ट्ये आणि अपडेट करण्याचा सोपा मार्ग.Windows 11 2022 अपडेटचे नवीन फीचर्सनवीन अपडेटबद्दल, मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे की Windows 11 2022 आवृत्ती मुख्यतः यूज, प्रॉडक्टिव्हीटी, कनेक्टिव्हिटी आणि सिक्योरिटी यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून अपडेट केली गेली आहे. नवीन अपडेटनंतर तुम्हाला स्टार्ट मेनूमध्ये Quick Settings चा पर्याय देखील मिळेल. या बदलांमुळे आता तुम्हाला विजेट्स बोर्डमध्ये अधिक अचूक सर्च करता येतील. फाइल एक्सप्लोररचे टॅब लोकल आणि प्रजेंट इव्हेंट कव्हरेजमध्ये देखील सुधारणा करण्यात आल्या आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, या अपडेटमध्ये विंडोज तुमच्या गरजांचा अंदाज घेते आणि तुमचा वेळ वाचवते.मायक्रोसॉफ्टच्या दाव्यानुसार, विंडोज 11 च्या नवीन अपडेटमध्ये, वाईड लाइव्ह कॅप्शन सिस्टीमद्वारे कोणत्याही प्रकारच्या ऑडिओ कंटेटमध्ये ऑटोमॅटीक कॅप्शन तयार केले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, वायर एक्सेसमध्ये देखील सुधारित केला आहे. आता वापरकर्ते त्यांचा आवाज वापरून पीसीवर मजकूर टाइप करू शकतील. यामध्ये नॅचरल व्हॉइस फॉर नॅरेटरच्या मदतीने नॅचरल स्पीच देखील जवळून ऐकता येते. नवीन अपडेटमध्ये, ऑनलाइन सुरक्षा आणि डेटा गोपनीयता यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. विंडोजची ही आतापर्यंतची सर्वात सुरक्षित आवृत्ती असल्याचे मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे. यासोबतच कंपनीने विंडोज 11 च्या नवीन अपडेटमध्ये नवीन स्मार्ट अॅप कंट्रोल देखील समाविष्ट केले आहे.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म8 minutes ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग13 minutes agoVIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत15 minutes agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.17 minutes agoहेही वाचा: Honor चे भारतात दमदार पुनरागमन, लॉंच केला नवीन टॅबलेट; जाणून घ्या किंमतनवीन विंडोज अपडेटमध्ये सुधारित टच नेव्हिगेशन, फोकस मोड आणि डू नॉट डिस्टर्ब (DND) यांचाही समावेश करण्यात आला आहे. यासोबतच मायक्रोसॉफ्ट स्टोअरॉसाठी विंडोज स्टुडिओ इफेक्ट्समध्ये फीचर्स देण्यात आले आहेत. गेमिंगसाठी अनेक नवीन फीचर्स, नवीन टूल्स आणि नवीन फीचर्स देखीस समाविष्ट करण्यात आले आहेत.डाउनलोड कसे करालWindows 11 च्या नवीन अपडेटसाठी तुमच्या सिस्टीममध्ये आधीपासूनच windows 11 असणे आवश्यक आहे. नवीन अपडेट्ससाठी तुम्हाला तुमच्या PC मधील Settings या पर्यायावर जावे लागेल आणि तेथून Windows Update वर क्लिक करा. आता तुम्हाला Check for updates वर क्लिक करावे लागेल. तुमच्या डिव्हाइससाठी नवीन अपडेट उपलब्ध असल्यास, तुम्हाला डाउनलोड पर्याय दिसेल. त्यानंतर तुम्ही ते डाउनलोड करून अपडेट करू शकता. हेही वाचा: Lava चा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लॉंच, तुमच्या बजटमध्ये मिळेल 50MP कॅमेरा