केवायसीच्या नावाखाली अभिनेते अन्नू कपूर यांचीही फसवणूक; ४.३६ लाखांचा गंडा
सिनेमा

केवायसीच्या नावाखाली अभिनेते अन्नू कपूर यांचीही फसवणूक; ४.३६ लाखांचा गंडा

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर यांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. अन्नू कपूर यांच्या बँकेच्या खात्यातून 4.36 लाख रुपये काढले गेले. तथापि, पोलीसांनी त्वरित तपास केल्याने ३ लाख ८ हजार परत मिळविण्यात ओशिवरा पोलिस ठाण्यातील पोलिसांना यश आलं आहे. (actor annu kapoor news in Marathi)

ओशिवरा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अन्नू कपूर यांना बुधवारी एक फोन आला होता. त्यामध्ये त्यांना केवायसी अपडेट करण्याची आवश्यकता असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर अन्नू कपूर यांना बँकेची माहिती मागण्यात आली. तसेच वनटाईम पासवर्ड अर्थात ओटीपी शेअर करण्यास सांगण्यात आलं. त्यानुसार कपूर यांना ओटीपी शेअर केला.

दरम्यान फोन करणाऱ्या व्यक्तीने काही वेळाने अन्नू कपूर यांच्या खात्यातून चार लाख ३६ हजार काढून घेतले. मात्र तातडीने अन्नू कपूर यांना बँकेकडून फोन आला आणि पैसे कपात झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कपूर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तत्काळ ऍक्शनमोडमध्ये येत दोन्ही बँकांचे अकाउंट फ्रीज केले. त्यामुळे तीन लाख ८ हजार रुपये परत मिळविण्यात यश आले. आता पोलिस पुढील तपास करत आहेत