महिंद्राने पुन्हा परत मागवल्या XUV700 अन् Thar, जाणून घ्या कारण
इन्फोटेक

महिंद्राने पुन्हा परत मागवल्या XUV700 अन् Thar, जाणून घ्या कारण

महिंद्रा XUV700 आणि थार दोन्ही वाहनांच्या टर्बोचार्जरमध्ये समस्या आल्यानंतर या दोन्ही गाड्या कंपनीकडून परत मागवल्या जात आहेत. दरम्यान महिंद्राची XUV700 परत मागवण्याची ही पहिलीच वेळ नाही. या गाड्या रिकॉल केल्यामुळे ग्राहकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते.महिंद्राचा XUV700 पेट्रोल व्हेरियंट त्याच्या GVV व्हेंट पाईप आणि टी-ब्लॉक कनेक्टर इंस्टॉलेशनच्या चाचणीसाठी परत मागवण्यात आली आहे. लाइफस्टाइल ऑफ-रोडर थार बद्दल बोलयचे झाल्यास, डिझेल व्हेरिएंटमध्ये XUV700 प्रमाणेच टर्बो अ‍ॅक्ट्युएटर समस्या असल्याचे बोलले जात आहे.कंपनी डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही व्हेरिएंटवर टायमिंग बेल्ट आणि ऑटो-टेंशनर बदलत आहे. कंपनीने या रिकॉलमध्ये सर्व XUV700s आणि थारचा समावेश केलेला नाही. या रिकॉलमध्ये किती वाहने परत मागवण्यात आली हेही अद्याप कळू शकलेले नाही. तथापि, ग्राहक ‘सर्व्हिस-अॅक्शन’ सेक्शनमध्ये हे तपासू शकतात. महिंद्राच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुमचे वाहन रिकॉल केलेल्या वाहनांमध्ये आहे की नाही ते पाहू शकता.Recommended Articlesरात्रीच्या शिळ्या डाळीपासून हे पदार्थ करारात्रीची शिळी डाळ फेकण्यापेक्षा त्यापासून इतर पदार्थ तयार करता येतील. 2 hours agoरश्मिका मंदानाने वाढवले पुन्हा फॅन्सच्या हृदयाचे ठोके…दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाची फॅन फॉलोइंग खूपच मोठी आहे.2 hours agoKuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तरKuldeep Yadav Hat-Trick : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कधी भारतीय संघात दिसतो तर कधी नाही. जरी संघात असला तरी त्याला मालिकेतील सर्व सामन्यात खेळण्याची संधी मिळले याची शाश्वती नसते. मात्र भारतीय ‘अ’ संघाकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवने निवडसमिती आणि संघ व्यवस्थापनाला आपल्याबाबत नव्याने व2 hours agoत्या वक्तव्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाणांनी गमावले ?डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरुन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. मंत्री चव्हाण यांच्या डोंबिवलीतील त्या वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज झाला आहे. डोंबिवलीतील शिंदे गटासह ठाकरे गटाने देखील चव्हाण यांच्यावर रस्ते कामावरुन टिकेची 2 hours agoहेही वाचा: मारुती उद्या लॉंच करणार सर्वाधिक मायलेज असलेली ‘ही’ नवीन SUV, वाचा डिटेल्समहिंद्राने अलीकडेच XUV700 आणि थारच्या किमतीही वाढवल्या आहेत. XUV700 आता 37000 रुपयांनी आणि थार 28000 रुपयांनी महागली आहे.या दोन्ही SUV मध्ये 2.2L टर्बो-डिझेल इंजिन आणि 2.0L टर्बो-पेट्रोल इंजिन आहे.हेही वाचा: TVS ने लाँच केली नवीन ज्युपिटर क्लासिक स्कूटर, जाणून घ्या किंमत-फीचर्स