वरुण धवन-सुहाना खान स्टारकिड असूनही घेतायंत मेहनत! वाचा काय म्हणतेय जुही चावला?
सिनेमा

वरुण धवन-सुहाना खान स्टारकिड असूनही घेतायंत मेहनत! वाचा काय म्हणतेय जुही चावला?

मुंबई: गेल्या चार दशकांपासून मनोरंजन विश्वामध्ये अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) काम करत आहे. जुहीनं आतापर्यंत अनेक दिग्गद अभिनेते, दिग्दर्शक, निर्मात्यांबरोबर काम केलं आहे. आता जुही ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या ‘हश हश या वेब सीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. त्यानिमित्तानं जुहीनं पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडमधील नेपोटिझमवर भाष्य केलं आहे. यावेळी जुहीनं बॉलिवूडमधील स्टार किड्सची पाठराखणही केली आहे.

काय म्हणाली जुही चावला

जुही चावलानं तिच्या चाळीस वर्षांच्या सिनेकरिअरमध्ये अनेक कलाकारांबरोबर काम केलं आहेत. त्यातील काही कलाकारांच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. त्या संदर्भात जुहीला मुलाखतीत प्रश्न विचारला. त्याचं उत्तर देताना जुहीनं सांगितलं की, ‘माझ्याबरोबरच्या अनेक सहकलाकारांची मुलं आता मोठी झाली आहेत. त्यातील काहीजणांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आता कियारा अडवाणी ही माझ्या जवळच्या मित्राची मुलगी आहे. तिला लहानाची मोठी होताना मी बघितलं आहे. त्याचप्रमाणं शाहरुखची लेक सुहाना, डेविड धनवचा मुलगा वरुण हे देखील बॉलिवूडमध्ये काम करत आहेत.’

जुही मुलाखतीमध्ये पुढं म्हणाली की, ‘शाहरुखची लेक सुहाना ही तर माझ्यासमोर मोठी झाली आहे. लवकरच ती देखील बॉलिवूडमध्ये येत आहे. हे सारं बघणं माझ्यासाठी खूपच आनंददायी आहे. आता जी मुलं आली आहेत ती खरोखरच प्रतिभाशाली आहेत. ‘

स्टारकिड्सही घेतात मेहनत

या मुलाखतीमध्ये जुही चावला हिनं स्टारकिड्सचं कौतुक केलं आहे. ती म्हणाली की, ‘भलेही कलाकारांची मुलं त्यांच्या पालकांमुळे बॉलिवूडमध्ये आली आहे. तरी त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींचा ते गैरफायदा घेत नाहीत. ते कठोर मेहनत घेऊन काम करत आहेत. कुणीही मी अमुक कलाकाराचा मुलगा आहे म्हणून त्याचा दुरुपयोग ते करत नाही. मी कलाकाराचा मुलगा आहे म्हणून मी सेटवर ही कामं करणार नाही, असं ते म्हणत नाहीत. अनेक कलाकारांची मुलं खूप मेहनत घेत आहेत. हे पाहताना खूप छान वाटतं. आता तुम्ही मला जर विचारलं की यात तुमचं आवडतं कोण आहे, याचं उत्तर मी नाही देऊ शकणार. कारण या सगळ्याच मुलांना मी लहानाचं मोठं होताना पाहिलं आहे. त्यामुळे मी त्यांच्यात फरक करू शकत नाही.’

डेविड धवन यांचा मुलगा वरुणनं करण जोहर याच्या २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यानं दुल्हनिया, अक्टूबर, जुग जुग जियो सारख्या सिनेमांत काम केलं आहे. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. अनेक समीक्षकांनीही त्याचं कौतुक केलं आहे. सुहाना झोया अख्तर हिच्या द आर्चीस सिनेमातून पदार्पण करणार आहे. तर बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहेत.

दरम्यान,जुही चावला हिच्या कामाबद्दल सांगायचं तर हश हश या थ्रिलर वेब सीरिजमधून तिनं ओटीटीवर पदार्पण केलं आहे. तनुजा चंद्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या सीरिजमध्ये सोहा अली खान, शाहाना गोस्वामी, कृतिका कामरा आणि आयशा झुल्का प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.