Battery Tips : स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप वाढवायचा असेल तर नोट करा ‘या’ टिप्स, फोन चालेल नव्यासारखा
इन्फोटेक

Battery Tips : स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप वाढवायचा असेल तर नोट करा ‘या’ टिप्स, फोन चालेल नव्यासारखा

नवी दिल्ली: Smartphone Battery : फोनवर इंटरनेट आणि कॅमेराच्या अतिवापरामुळे त्याची बॅटरी लवकर संपते. पण, जर तुमचा फोन गरजेपेक्षा जास्त बॅटरी वापरत असेल आणि तुम्हाला फोनच्या बॅटरी बॅकअपची काळजी वाटत असेल तर आज आम्ही काही टिप्स तुमच्यासोबत शेयर करणार आहो. ज्याच्या मदतीने तुमची समस्या मार्गी लगेल. या टिप्स तुमच्या फोनची बॅटरी सेव्ह करण्यात आणि बॅटरी बॅकअप वाढवण्यातही मदत करतील. आजकाल स्मार्टफोनचे डिस्प्ले मोठे आणि अधिक ब्राईट होत आहेत, ज्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते. तुम्ही फोनचा ब्राइटनेस ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही तो ऑटो-ब्राइटनेस मोडवर देखील सेट करू शकता. यामुळे तुमच्या फोनची अधिक बॅटरी वाचते.

फोनची बॅटरी वाचवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे फोनमधील सर्व अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करणे. यामुळे तुमच्या फोनमध्ये नोटिफिकेशन्स पुन्हा पुन्हा दिसणार नाहीत. गरज नसताना तुम्ही GPS लोकेशन देखील बंद करू शकता. यामुळे तुमची बॅटरीही वाचू शकते. तुमच्या फोनचे अॅप्स आणि ऑपरेटिंग सिस्टम अपडेटड ठेवा. या सेटिंगसह, फोन सुरळीत काम करतो आणि कमी बॅटरी वापरतो. यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यांतून एकदा फोनचे सर्व आवश्यक अपडेट्स तपासले पाहिजे.

पॉवर सेव्हिंग मोड :

पॉवर सेव्हिंग मोड देखील वापरू शकता. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी ५० टक्क्यांपर्यंत वाढते. या मोडमध्ये, फोन फक्त तुम्ही ज्या अॅपवर काम करत आहात त्यावर प्रक्रिया करतो, त्यामुळे अनावश्यक Background Activities आपोआप थांबतात.

स्मार्टफोनचा कॅमेरा:

स्मार्टफोनचा कॅमेरा आणि इंटरनेट सर्वाधिक बॅटरी वापरतात. यासाठी तुम्ही गरज नसताना इंटरनेट बंद देखील करू शकता. यामुळे तुमच्या फोनचा बॅटरी बॅकअप वाढतो.

मूळ चार्जर:

फोनच्या मूळ चार्जरनेच फोन चार्ज करा. यासोबतच तुमच्या फोनची बॅटरी हेल्थ आणि बॅटरी बॅकअपही ठीक आहे. क्षमतेपेक्षा जास्त पॉवर असलेल्या चार्जरने फोन चार्ज करणे टाळा. यामुळे तुमचा फोन लवकर चार्ज होतो. पण, त्याचा परिणाम बॅटरीवर होतो आणि फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते.