आधार क्रमांकाच्या मदतीने मिनिटांत डाउनलोड Aadhar Card, पाहा सोपी प्रोसेस
इन्फोटेक

आधार क्रमांकाच्या मदतीने मिनिटांत डाउनलोड Aadhar Card, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली: Aadhar Card Holder:आधार कार्डशिवाय सर्व अधिकृत कामे पूर्ण करणे आता अशक्य आहे. आधार भारतातील सर्वात जास्त वापरला जाणारा ओळखीचा पुरावा आहे. नवीन बँक खाते, सिम कार्ड खरेदी करण्यापासून प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीसाठी आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे.PAN , Voter ID, पासपोर्ट आणि बँक खाते अशा सर्व कागदपत्रांसह आधार कार्ड लिंक करणे तुमच्यासाठी आवश्यक झाले आहे. अशा स्थितीत तुमच्यासोबत आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला जर आधार कार्ड क्रमांकावरून आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे याबद्दल माहिती नसेल तर ही विशेष माहिती तुमच्यासाठी.

आधार क्रमांकावरून आधार कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत आणि थोड्याच वेळात तुमचे आधार कार्ड डाउनलोड केले जाईल. सर्वप्रथम भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) www.uidai.gov.in ची अधिकृत वेबसाइट उघडा होम पेजवर तुम्हाला ‘My Aadhaar’ चा पर्याय दिसेल आणि त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला ‘Get Aadhaar’ वर जावे लागेल आणि ‘Download Aadhaar’ पर्यायावर क्लिक केल्याने एक नवीन वेब पेज उघडेल.

तुम्हाला ‘आधार क्रमांक’ पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि १२ अंकी आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. : यानंतर तुम्हाला कॅप्चा व्हेरिफिकेशन पूर्ण करावे लागेल आणि ‘ओटीपी पाठवा’ बटण दाबावे लागेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.

तुम्हाला मास्क आधार कार्ड किंवा नियमित आधार कार्डचा पर्याय निवडावा लागेल. नियुक्त केलेल्या ठिकाणी हा OTP एंटर करा आणि ‘Verify and Download’ बटणावर क्लिक करा. OTP Verify झाल्यानंतर तुमचे आधार कार्ड डाउनलोड केले जाईल. सुरक्षेमुळे मास्क आधार कार्डमध्ये शेवटचे चार अंक नसतात.