Vinod Adani: गौतम अदानीचे बंधू सर्वांत श्रीमंत NRI; दिवसाला कमावतात 102 कोटी
ताज्या बातम्या

Vinod Adani: गौतम अदानीचे बंधू सर्वांत श्रीमंत NRI; दिवसाला कमावतात 102 कोटी

नवी दिल्ली : देशातील मोठे उद्योगपती गौतम अदानी हे जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर त्यांचे मोठे बंधू विनोद शांतीलाल अदानी हे सर्वांत श्रीमंत NRI (अनिवासी भारतीय) बनले आहेत. IIFLच्या वेल्थ हिरून इंडिया रिचलिस्टमधून ही माहिती समोर आली असून ते दिवसाला जवळपास १०२ कोटी एवढी कमाई करतात.(Vinod Adani is Richest NRI Who Earn 102 Crore Per Day)जगातील दुसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी हे दुबईत राहतात. ते दुबई, सिंगापूर आणि जकार्ता येथे व्यापार आणि व्यवसायाचे व्यवस्थापनाचं काम करतात. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती 28 टक्क्यांनी म्हणजेच 37,400 कोटी रुपयांनी वाढली आणि भारतातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत सहाव्या स्थानावर मजल मारली होती. गेल्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती तब्बल 850 टक्क्यांनी म्हणजे 151,200 कोटी रुपयांनी वाढून 169,000 कोटी रुपये झाली आहे. तर त्यांनी आता सर्वांत श्रीमंत अनिवासी भारतीय होण्याचा मान मिळवला आहे. Recommended ArticlesMLA Madhuri Misal यांना खंडणीची मागणी; पैसे न दिल्यास दीराच्या खुनाची धमकीपुणे : पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर खंडणी न दिल्यास त्यांचा दीर बाबा मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दोघांच्याही मोबाईलवर मेसेज करून दोन ते पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. 7 hours agoPune : रिझर्व्ह बँकेचे नियम पाळून कामकाज करा- अजित पवारबारामती : असंख्य ठेवीदारांच्या हिताचा विचार करुनच रिझर्व्ह बँकेने विविध नियम अधिक कडक केलेले आहेत, सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन पारदर्शकता ठेवत प्रभावी वसूली करुन बारामती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने कामकाज करावे, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. बारामती सहकारी बँकेची 67 hours agoShare Market : 5 वर्षांत 2 कोटी रुपये, SIPमध्ये अशी करा गुंतवणूकम्युच्युअल फंड गुंतवणूकीत तुम्ही लाँग टर्ममध्ये मोठा फंड तयार करु शकता. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी लाँग टर्ममध्ये 12 ते 15 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एकरकमी आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) करता येते. जर तुम्हाला 15 वर्7 hours agoVideo: आयव! दफ्तरात नागोबा… अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ समोर येत असतात. काही मजेशीर तर काही अंगावर काटा आणणारे असतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय. एका विद्यार्थीनीच्या शाळेच्या दफ्तरमध्ये चक्क विषारी नाग निघाला. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. सधया या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल7 hours agoहेही वाचा: United Nations: दहशतवादावरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीन, पाकिस्तानला खडसावलेतर अनिवासी सर्वांत श्रीमंतांच्या यादीत हिंदुजा ब्रदर्स हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती १.६५ लाख कोटी इतकी आहे. त्यानंतर एल.एन. मित्तल हे १.५ लाख कोटी संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर जय चौधरी, अनिल अग्रवाल, युसूफ अली. पल्लोंजी मिस्त्री, श्रीप्रकाश लोहिया, राकेश गंगवाल यांचा क्रमांक लागतो.