तुम्ही माझी संधी हिरावून घेऊ शकता पण माझी प्रतिभा नाही… अभिज्ञा भावेची नवी पोस्ट चर्चेत
सिनेमा

तुम्ही माझी संधी हिरावून घेऊ शकता पण माझी प्रतिभा नाही… अभिज्ञा भावेची नवी पोस्ट चर्चेत

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave Instagram Post) नेहमीच चर्चेत असते. ती सध्या ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिज्ञा साकारत असलेल्या वल्ली या भूमिकेवर लोक कितीही वैतागले, तरीही अभिज्ञाची भूमिका चाहत्यांना खूप आवडते. मालिकांमध्ये अनेकदा लबाड, कपटी अशी व्यक्तिरेखा साकारणारी अभिज्ञा खऱ्या आयुष्यात मात्र फार वेगळी आहे. तिच्या आयुष्यातील आलेले चढ-उतार तिनं नेहमीच चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अभिज्ञा सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिचे फोटो नेहमीच व्हायरल होतात. अभिज्ञानं नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लाल रंगाच्या ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिज्ञा खूपच हॉट दिसत आहे. परंतु अभिज्ञाच्या फोटोंबरोबरच तिनं हे फोटो शेअर केलेल्या पोस्टची जास्त चर्चा आहे.

काय आहे अभिज्ञाची पोस्ट

अभिज्ञानं लाल रंगाचा वेस्टर्न आऊटफिट परिधान करत फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करताना अभिज्ञानानं शेअर केलेल्या पोस्टनं जास्त लक्ष वेधलं आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘तुम्ही माझ्या काही संधी हिरावून घेऊ शकता.. माझा प्रतिभा नाही’. या पोस्टमधून अभिज्ञानाला नेमकं काय सुचवायचं आहे, याचा अंदाज चाहते लावत आहेत. अभिज्ञानं शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तसंच अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमेन्ट केल्या आहेत.

हे वाचा-प्रदर्शनाआधीच हृतिक-सैफचा धमाका! थिएटरमध्ये येण्यापूर्वी ‘विक्रम वेधा’ची तगडी कमाई

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिज्ञानानं स्विमिंग सूटमधील फोटो शेअर केला होता. तिनं शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला होता. काही दिवसांपूर्वी अभिज्ञा तिच्या काही मित्र मैत्रिणींसोबत ट्रीपवर गेली होती. तिथलाच हा फोटो होता. अभिनेत्री मयुरी देशमुखने काढलेला या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या होत्या.