Jofra Archer : मुंबई इंडियन्ससाठी मोठे बातमी; जोफ्रा आर्चरच्या फिटनेसबद्दल आली अपडेट
क्रीडा

Jofra Archer : मुंबई इंडियन्ससाठी मोठे बातमी; जोफ्रा आर्चरच्या फिटनेसबद्दल आली अपडेट

Mumbai Indians jofra Archer Injury Update : मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. जोफ्रा आर्चर सध्या दुखापतीतून सावरल्याचे मानले जात आहे. तसेच त्याने नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंड आणि मुंबई इंडियन्सच्या या वेगवान गोलंदाजाचा बॉलिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जोफ्रा आर्चर बराच काळ दुखापतीमुळे मैदानापासून दूर होता, मात्र आता तो मैदानात परतल्याची इंग्लंड आणि मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी आहे. IPL मेगा लिलाव 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने मोठी रक्कम खर्च करून जोफ्रा आर्चरला संघात घेतले होते. पण दुखापतीमुळे तो IPL 2022 मध्ये खेळू शकला नाही.

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वीच जोफ्रा आर्चर या हंगामात खेळू शकणार नाही हे त्याने निश्चित केले होते. तरीही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने या वेगवान गोलंदाजावर मोठी रक्कम खर्च करून आपल्या संघात सामील करून घेतले. मात्र आता जोफ्रा आर्चरने सराव सुरू केला आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स व्यवस्थापनासाठी ही दिलासादायक बातमी असल्याचे मानले जात आहे.

इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलेल्या जोफ्रा आर्चरने आयपीएलमध्येही छाप पाडली आहे, पण आयपीएल 2022 मध्ये तो दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला आशा आहे की जोफ्रा आयपीएल 2023 मध्ये आर्चर नक्कीच मैदानात परतेल. आयपीएल 2022 मध्ये 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरू शकली नाही.