Phone bhoot: कतरिनाच्या ‘फोन भूत’ चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज, जाणून घ्या तारीख
सिनेमा

Phone bhoot: कतरिनाच्या ‘फोन भूत’ चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज, जाणून घ्या तारीख

Katrina Kaif: लग्नानंतर कतरिना कैफ पुन्हा एकदा चित्रपटा मध्ये येण्यास सज्ज झाली आहे. काही महिन्यांपूर्वी कॅटचा ‘फोन भूत’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आजच्या पिढीतील प्रतिभावान कलाकार सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर या चित्रपटात बॉलिवूडच्या सुपरस्टार्ससोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत.(Phone Bhoot: Trailer Of Katrina Kaif’s Film To Release On This Date)

कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर एकत्र फोन भूत या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या तिघांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. गुरमीत सिंग दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा हा चित्रपट या वर्षी ४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्या शिवाय या चित्रपटात जॅकी श्रॉफ, शीबा चड्ढा आणि निधी बिश्त यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत. आता फोन भूतचे नवीन पोस्टर शेअर करण्यात आले आहे, ज्यामध्ये चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार हे लिहिले आहे.

हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. फोन भूतचा ट्रेलर १० ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. त्याचे कॅप्शन लिहिले आहे, ‘इनकमिंग कॉल… फोन भूतचा ट्रेलर १० ऑक्टोबरला रिलीज होणार आहे’. पोस्टर शेअर करताना, सिद्धांतने लिहिले – ‘थ्रिल सुरू होणार आहे…सर्व फोन वाजतील कारण ‘फोन भूत’चा ट्रेलर १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल’. त्याचवेळी ईशाननेही पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये तिघेही वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहेत.