UNSC : भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्य बनवा; अमेरिकेनंतर रशियाचाही पाठिंबा
ताज्या बातम्या

UNSC : भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्य बनवा; अमेरिकेनंतर रशियाचाही पाठिंबा

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council) कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी रशियानं (Russia) भारताला पुन्हा एकदा उघडपणे पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह (Russian Foreign Minister Sergei Lavrov) यांनी म्हटलं की, सुरक्षा परिषद अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न असून यासाठी लोकशाही मजबूत होणं आवश्यक आहे. त्यामुळं भारत (India) आणि ब्राझीलला सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळायला हवं, असं त्यांनी स्पष्ट करत पाठिंबा दिला.Recommended Articlesत्या वक्तव्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाणांनी गमावले ?डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरुन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. मंत्री चव्हाण यांच्या डोंबिवलीतील त्या वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज झाला आहे. डोंबिवलीतील शिंदे गटासह ठाकरे गटाने देखील चव्हाण यांच्यावर रस्ते कामावरुन टिकेची 3 hours agoKhambhatki Ghat: खंबाटकी घाटात दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगापुणे-बंगळुरू महामार्गावर रविवारी दुपारी खंबाटकी घाटात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवासी बऱ्याच वेळापासून वाहनात अडकून पडले आहेत. (khambhatki ghat news in Marathi)सविस्तर वृत्त थोड्याच वेळा…3 hours agoPune : कात्रज तलावात बूडून एकाचा मृत्यूकात्रज : नानासाहेब पेशवे तलावात एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी काही तरुण निघाले होते. त्यावेळी काहीजण बोटीने पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचले. मात्र, ज्ञानेश्वर पांचाळ (वय3 hours agoJalgaon : रस्त्यावरील खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी मोठा वाघोदा (ता. रावेर) : महामार्गावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी गेल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) घडली. वाघोदा बुद्रुक येथील नारायण साहेबराव धामोडे (वय ३३) हा रात्री काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला होता.(young man killed in accident due to potholes on road jalgaon latest news)3 hours agoहेही वाचा: Congress : निवडणुकीत चुरस वाढत असतानाच पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान; गेहलोतांबाबत म्हणाले..याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी भारत, जपान आणि जर्मनीला UNSC चे स्थायी सदस्य बनवण्यासाठी पाठिंबा दिला होता. मात्र, या दिशेनं अजून बरंच काम होणं बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतासह इतर 31 देशांनी आपल्या निवेदनात म्हटलंय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी आणि स्थायी सदस्यांच्या श्रेणी आणखी वाढवल्या पाहिजेत. सुरक्षा परिषदेच्या कामकाजात अजून सुधारणांची गरज असल्याचं भारतानं म्हटलं.हेही वाचा: Sachin Pilot : सचिन पायलटच होणार राजस्थानचे नवे मुख्यमंत्री? आज काँग्रेस आमदारांची महत्वपूर्ण बैठकभारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री संयुक्त राष्ट्र महासभेच्या 77 व्या सत्राला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दहशतवादासह शेजारी राष्ट्र चीन आणि पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. जयशंकर म्हणाले, ‘मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातून 130 कोटी लोकांच्या शुभेच्छा घेऊन इथं आलोय. भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे. त्याला आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणत आहोत. या युगाची कहाणी कोट्यवधी भारतीयांच्या कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि उपक्रमाची आहे.’