Share Market : 5 वर्षांत 2 कोटी रुपये, SIPमध्ये अशी करा गुंतवणूक
अर्थविश्व

Share Market : 5 वर्षांत 2 कोटी रुपये, SIPमध्ये अशी करा गुंतवणूक

म्युच्युअल फंड गुंतवणूकीत तुम्ही लाँग टर्ममध्ये मोठा फंड तयार करु शकता. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी लाँग टर्ममध्ये 12 ते 15 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एकरकमी आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) करता येते. जर तुम्हाला 15 वर्षात 2 कोटी रुपये जमवायचे असतील तर SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्हाला दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल ते जाणून घेऊयात.- दर महिन्याला 40,000 रुपये गुंतवल्यास आणि ते 15 वर्ष ही गुंतवणूक अशीच ठेवल्यास तुम्ही सहजपणे 2,01,83,040 रुपयांचा कॉर्पस तयार करू शकता.- अंदाजे वार्षिक परतावा 12% आहे, जो यापेक्षाही जास्त असू शकतो.Recommended Articlesभारतीयांसाठी व्हीएटनामचे ‘चाओ मुंग’मुंबई : कोरोनाचा कालखंड मागे पडल्यानंतर व्हिएतनाम या पॅसिफिक महासागराचा शेजार लाभलेल्या देशाने भारतीय पर्यटकांचे स्वागत (चाओ मुंग) करण्यासाठी अनेक सोयीसुविधा देऊ केल्या आहेत. तेथील अनेक आकर्षक पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सज्ज झाली आहेत. 1 hours agoNashik : शेतमाल विक्रीसाठी तारेवरची कसरत; कुंदर वस्ती शिवारातील विदारक चित्र नामपूर : गेल्या सहा- सात महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला बाजार समित्यांमध्ये भाव मिळत नसल्याने कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून कांद्याची विक्री सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कांद्याची विक्री करण्यासाठी निताणे (ता. बागलाण) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जीव धोक्यात घ1 hours agoNashik : डाऊनी कोबीच्या मुळावर शेतकऱ्यांची चिंता वाढली देवळा: कसमादे भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात कोबी लागवड झाली असली तरी या पिकावर डाऊनी रोगाने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. अतिवृष्टीने लाल कांद्याची रोपे व टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकाचे आधीच नुकसान झाले असून, चाळीत साठवणूक करून ठेवलेला उन्हाळी कांदाही1 hours agoIND vs AUS 3rd T20I : निर्णायक सामन्यावर फिरणार पाणी; हैदराबादमध्येही पावसाची शक्यता? IND vs AUS 3rd T20I Hyderabad Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्य1 hours agoहेही वाचा: Health : वजन कमी करताय; मग या पदार्थांना ‘खलनायक’ समजू नका, कारण…SIP कॅल्क्युलेटर: गुंतवणूक 72 लाख, नफा 1.29 कोटी तुम्ही 15 वर्षांसाठी SIP मध्ये महिन्याला 40,000 रुपये गुंतवले असतील, तर तुम्हाला सुमारे 1.29 कोटी रुपयांचा फायदा होतो. यात तुमची गुंतवणूक फक्त 72 लाख रुपये असेल. पण, 12% अंदाजे परतावा आहे, तो यापेक्षा जास्त असू शकतो किंवा कमीही असू शकतो. बाजारातील अस्थिरता म्युच्युअल फंड्सच्या कामगिरीवर परिणाम करू शकते.म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक लवकरात लवकर सुरू करावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण, यामुळे तुम्हाला लॉन्‍ग टर्मपर्यंत रिटर्न बेनेफिट मिळतो. समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 40,000 रुपयांची SIP सुरू केली, तर वयाच्या 40 व्या वर्षी तुमच्याकडे 2 कोटी रुपये असतील.एसआयपी ही गुंतवणुकीची सिस्‍टमॅटिक पद्धत आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला थेट बाजाराच्या जोखमीला सामोरे जावे लागत नाही. त्याच वेळी, परतावाही जास्त आहे. पण, यामध्येही धोका आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराने त्याचे उत्पन्न, टारगेट आणि रिस्‍क प्रोफाइल पाहूनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.हेही वाचा: Tourism : देशातील सर्वांत सुंदर रोमॅंटिक डेस्टिनेशन्स तुम्हाला माहिती आहेत का?नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.